अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा 'तू झूठी मैं मक्कार' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. दोघेही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. याचदरम्यान श्रद्धाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते दंगा घालत आहेत. '१० रुपयांची 'पेप्सी, श्रद्धा कपूर सेक्सी' असे चाहते म्हणत आहेत. श्रद्धा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अहमदाबाद येथील मॉलमध्ये पोहोचली होती. व्हिडीओमध्ये श्रद्धा स्टेजवर उभी असल्याची दिसत असल्याने चाहत्यांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली आहे. श्रद्धाला पाहून काही महिला चाहत्या म्हणतात, '१० रुपयांची पेप्सी, श्रद्धा कपूर सेक्सी ! ' यानंतर श्रद्धाला आपले हसू आवरत नाही आणि ती मोठ्याने हसू लागते. हा व्हिडीओ युजर्सना खूपच पसंत पडत आहे.