मनोरंजन

हे केवळ सेल्फीसाठी?

स्वालिया न. शिकलगार

मुंबईत सोमवारी रात्री गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्कीची घटना घडली. शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार प्रकाश फातर्पेकर यांचे चिरंजीव स्वप्निल फातर्पेकर यांच्यावर धक्काबुक्कीचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात सोनू निगमने चेंबूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हा संपूर्ण वाद एका सेल्फीमुळे झाल्याचे बोलले जात आहे. चेंबूर परिसरात लाइव्ह परफॉर्मन्सनंतर जसा सोनू बाहेर पडल्यानंतर पायर्‍या उतरताना त्याच्यासोबत ही घटना घडली. यावर सोनू म्हणाला, जेव्हा तुम्ही जबरदस्तीने फोटो किंवा सेल्फी घेण्याचा प्रयत्न करता त्यानंतर उद्धटपणा, धक्काबुक्की हे सर्व घडते, मी स्टेजवरून खाली उतरत होतो तेव्हा स्वप्निल प्रकाश फातर्पेकर यांनी मला अडवले. त्यानंतर त्यांनी हरी आणि रब्बानी यांना ढकलले, जे मला वाचवायला आले होते. माझ्याकडे एक व्यक्ती सेल्फीसाठी आली होती. मी नकार दिल्यानंतर त्याने मला अडवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT