प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. आता त्यानंतर ती प्रथमच मुंबईत पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली आहे. अनुश्री रेड्डीने डिझाईन केलेला ड्रेस तिने परिधान केला होता. पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये ती खूपच सुंदर आणि आनंदी दिसत होती. तिचा रॅम्स वॉक करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिने व्यायामाकडे लक्ष दिले आहे. तिने योगा करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, तिचा 'ताली' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात ती गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची 'आर्या 2' ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यातील तिच्या नैसर्गिक अभिनयाचे समीक्षकांकडून खूप कौतुक झाले होते. लवकरच या वेबसीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आर्या 3' ही सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होत आहे.