जेनेलिया डिसूझा 
मनोरंजन

हसण्यात खूप ताकद : जेनेलिया डिसुझा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री जेनेलिया देशमुख भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेत्री आहे. डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेड' या चित्रपटातून तिने मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. आता जेनेलियाची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

जेनेलियाने तिचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात ती दिलखुलासपणे हसताना दिसत आहे. मात्र, लक्ष वेधून घेतले ते तिने या व्हिडीओ खाली लिहिलेल्या कॅप्शनने, ती म्हणते हसत राहण्याची आठवण करून देण्यासाठी ही पोस्ट, हसत राहा. केवळ एक उत्तम औषध नाही तर दिवसाला सुंदर दिवस बनवण्याची ताकद त्यात आहे. मी पहिल्यांदा अभिनयाची सुरुवात केली तेव्हा मला अनेकांनी एकच गोष्ट सांगितली आणि मला खाली खेचण्याचा प्रयत्न केला ती म्हणजे तुझे हसू खूप जास्त मोठे आहे, तुला त्यावर काम करावे लागेल, मी जर त्यांचे ऐकले असते तर आज मी एक दुःखी आणि कमीपणाला कुरवाळत बसलेली व्यक्ती असते. माझ्यातील कमीपणा माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा असता, पण मी तसे केले नाही. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात आनंद माना.

मराठीतील या पोस्टची खूप चर्चा रंगली झाली. तिने दाखवलेल्या पाडसाचे सर्वजण कौतुक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT