सोनाली कुलकर्णी या महाराष्ट्राच्या अप्सरेची सध्या मालदीवच्या किनाऱ्यावर धमाल सुरु आहे. तिने इन्स्टाग्रामवर बिकीनी मधील फोटो शेअर करुन इकडे मात्र चाहत्यांची झोप उडवली आहे.
सोनाली कुलकर्णीचे बिकीनी मधील हॉट फोटो पाहून तिचे महाराष्ट्रातील चाहते ऐनं पावसाळ्यात मात्र चांगलेच गरम झाले आहेत.
सोनाली कुलकर्णी सध्या मालदीवमध्ये पती कुणाल बेनोदेकर सोबत व्हेकेशन इन्जॉय करते आहे. सध्या मालदीवच्या रंगात हे रोमँटीक कपल चांगलेच रंगून गेले आहे.
मालदीवच्या सागरी किनाऱ्यावरील अनेक फोटो सोनाली कुलकर्णीने सोशल माध्यमात शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णीने बिकीनी मधील फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत तिने कुणालच्या हाती हात दिला आहे. शिवाय तिच्या बोटात तिची वेडिंग रिंग दिसते आहे.
या फोटो सोबत तिने पोस्ट केले आहे की, अनन्यसाधारण पद्धतीने माझ्या आवडत्या व्यक्तीने माझ्या आवडत्या ठिकाणी मला प्रेमाचं वचन दिलं आहे.
हे दोघे ही आपले रोमँटीक व्हेकशन कशापद्धतीने इन्जॉय करत आहेत हे या पोस्ट वरुन लक्षात येते. या फोटोमधून दोघे ही प्रेमात आणि मालदीवच्या निसर्ग सौदर्यांत आकंठ बुडल्याचे लक्षात येते.
काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये सोनाली कुलकर्णी आपल्या जवळचा मित्र कुणाल बेनोदेकर यांच्या सोबत विवाह बंधनात अडकली होती. भारतातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तिने दुबईमध्ये अत्यंत साधेपणाने लग्न केले होते.
लग्नानंतर ती काही दिवसांनी आफ्रिकेमध्ये हनिमूनसाठीही गेली होती. सध्या ती मालदीवमध्ये व्हेकेशनसाठी गेली आहे.
मालदीव हे सर्वच सेलिब्रिटींचे हॉट डेस्टीनेशन ठरत आहे. आपल्याकडील बॉलिवूड मधील सर्वच कलाकार हे मालदीवला व्हेकेशनसाठी सर्सास जाताना दिसतात. मागील लॉकडाऊनमध्ये अनेक अभिनेत्री आणि अभिनेते हे मालदीवला सुट्टी घालवला गेले होते. तेव्हा भारतातून त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. देश कोरोनाच्या संकटात सापडला असताना तुम्ही मालदीवला सुट्टी कशी काय इन्जॉक करु शकता.
आता मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सुद्धा सुट्टी घालविण्यासाठी मालदीवला गेली आहे.