मनोरंजन

साराने सलमानला म्हटले ‘अंकल’!

Shambhuraj Pachindre

सलमान खानचे वेळीच लग्न झाले असते तर आतापर्यंत त्याच्या मुलांचीही लग्ने झाली असती. मात्र, अजूनही तो इंडस्ट्रीतील 'मोस्ट एलिजेबल बॅचलर' बनून राहण्यातच खूश आहे. त्याचा मित्र सैफ अली खानची कन्या साराने 'आयफा' सोहळ्यात याबाबत त्याच्या केलेल्या गमतीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. (अर्थातच हे सर्व काही आधीच ठरलेले असते.) या व्हिडीओत दिसते की, सलमान आणि सारा स्टेजवर एकमेकांशी संवाद साधत आहेत. सारा म्हणते, मी एक नवा ब—ँड लाँच करणार आहे…सलमान अंकलबरोबर! यावर सलमान तिला म्हणतो, 'आपकी पिक्चर तो गयी!' सारा आश्‍चर्याने त्याला विचारते, 'का?' यावर सलमान शांतपणे म्हणतो, 'आपने सबके सामने मुझे अंकल बुलाया!' त्यांचा हा संवाद ऐकून सगळे हसू लागले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT