मनोरंजन

सलमानसाठी शाहरुखने थांबवले ‘जवान’चे शूटिंग

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खान आणि शाहरुख खान हे एकमेकांच्या आगामी चित्रपटांमध्ये कॅमियो करत आहेत. निर्माता आदित्य चोप्रा याला त्याच्या चित्रपटांचा एक स्पाय युनिव्हर्स करायचा आहे. त्यामुळे सलमान साकारत असलेला टायगर 'वॉर'मध्ये हृतिक रोशनने साकारलेला कबीर आणि आगामी 'पठाण'मधील शाहरुख हे सर्व हेर या स्पाय युनिव्हर्समध्ये पुढील एका चित्रपटात एकाच मोठ्या शत्रूशी एकत्रपणे लढताना दिसून येऊ शकतात. त्यामुळेच 'पठाण'मध्ये सलमानचा 'टायगर' म्हणून तर 'टायगर 3'मध्ये शाहरुखचा कॅमिओ असणार आहे. 'टायगर 3' मधील कॅमियो शूट करण्यासाठी शाहरुख त्याच्या 'जवान'चे शूटिंग पुढे ढकलणार आहे. या महिन्याच्या अखेरीस हे शूटिंग होऊ शकते. सप्टेंबरअखेरच्या तारखा शाहरुखने 'जवान'साठी दिल्या होत्या. पण सलमानसाठी त्याने यात बदल केला आहे. कारण 'टायगर 3'चे शूटिंग जवळजवळ संपत आले आहे. यात इम—ान हाश्मी खलनायक साकारत आहे. दरम्यान, नुकताच सलमानच्या आगामी 'भाईजान' चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आहे.

SCROLL FOR NEXT