मनोरंजन

सलमान-रामचरण एकत्र झळकणार

स्वालिया न. शिकलगार

सलमान खानच्या 'गॉडफादर' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सलमान खान आणि मेगास्टार चिरंजीवी त्यांच्या आगामी 'गॉडफादर' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचप्रसंगी पोहोचले. यावेळी सलमानने एक गुड न्यूज दिली आहे. तो एका आगामी चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता राम चरणबरोबर स्क्रीन शेअर करणार असल्याचे त्याने सांगितले. हा चित्रपट म्हणजे 'किसी का भाई किसी की जान.' तो म्हणाला, आम्ही हैदराबादमध्ये शूटिंग करत होतो. राम चरण मला भेटायला आला. तो म्हणाला, मला तुझ्यासोबत काम करायचे आहे. मी नाही म्हणालो. मग, तो म्हणाला, मला तुझ्यासोबत काम करायचे आहे. मला वाटले की, तो मस्करी करतोय, म्हणून मी म्हणालो की, ठीक आहे; पण दुसर्‍या दिवशी तो व्हॅन, पोशाख आणि बाकी सगळ्या गोष्टी घेऊन सेटवर तयार होता. मी त्याला विचारले, तू इथे काय करतोस? त्यावर तो म्हणाला, तू मला खूप आवडतोस. मला तुझ्यासोबत काम करायचे आहे, तू मला ते करूदे. त्यावर मी तयार झालो आणि आम्ही एकत्र काम केले, असे सलमान म्हणाला.

SCROLL FOR NEXT