पुढारी ऑनलाईन : 'तू बॉम्ब नाहीस तू तर रॉकेट आहेस. खूप छान दिसतेस.' दुसर्याने लिहिलय, 'अशीच प्रगती करत राहा. आणि आम्हाला घायाळ करत राहा.' नेटकर्यांनी तिच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. या कमेंटस् आहेत मराठीतील बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्याबद्दलच्या. निमित्त आहे सईने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोचे.
होय, तिचा हा फोटो एका फिटनेस मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकला आहे. यात तिने लिहलेय, 'माझ्यासाठी फिटनेस हा एक कठीण; पण मन शुद्ध करणारा प्रवास आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकल्याने मला माझ्या शरीराप्रती आणखी कृतज्ञ होण्याची एक संधी मिळाली आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे कायम
हातात हात घालून चालत असतात, हे लक्षात असायला हवं.'