दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप श्रुती हसनने पाडली आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. आता श्रुतीने एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे, यामुळे चाहते चिंतेत आहेत. शूटिंगच्या सेटवर तिच्याबाबत एक घटना घडली आहे. यामुळे श्रुती जखमी झाली आहे. स्वतः तिने याचा खुलासा केला आहे. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिच्या गुडघ्यांना दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. फोटो शेअर करत श्रुती म्हणते, कामाच्या ठिकाणी आणखी एक उत्तम दिवस! ती शूटिंगदरम्यान जखमी झाली असल्याचा तिच्या कॅप्शनवरून अंदाज वर्तवला जात आहे.