मनोरंजन

शशांक केतकरचा रस्त्यांवरून संताप

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याच्या आयुष्यातील घटना सोशल मीडियावरून शेअर करतो. नुकतीच त्याने एक पोस्ट केली आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली.

पोस्टमधून त्याने सध्या नागरिकांना भेडसावत असलेल्या महत्त्वाच्या समस्येवर मत व्यक्त केले आहे.त्याने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आणि रस्त्यांच्या अवस्थेबाबत संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ आहे मालाडचा.

या व्हिडीओत रहदारीच्या चौकात तेथील रस्त्याची किती दुरवस्था झाली आहे ती शशांकने नेटकर्‍यांना दाखवली आहे. रस्त्याच्या अशा अवस्थेला जे जबाबदार असतात त्यांनी एकदा येथून प्रवास करून बघावे. रस्त्यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत आवाज उठवण्याचे आवाहन शशांकने केले आहे.

SCROLL FOR NEXT