मनोरंजन

शरद केळकर साकारणार बाजीप्रभू देशपांडे

स्वालिया न. शिकलगार

अभिजित देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे एक पोस्टर प्रकाशित झाले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट आणि वेबमालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंच्या करारी भूमिकेत झळकणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शरद केळकर म्हणाला, आपण लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया, गनिमी काव्याच्या, त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याच्या अनेक प्रेरणादायी कथा वाचत आलो आहोत. बाजीप्रभूंच्या पावनखिंडीची वीरगाथा ही त्यापैकी एकच. बाजीप्रभू या व्यक्तिमत्त्वाबद्दल जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे छत्रपती शिवराय आणि स्वराज्याप्रती त्यांची असलेली कमालीची निष्ठा आणि प्रेम. पावनखिंडीत त्यांनी दाखविलेला पराक्रम प्रेरणादायी आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच भावेल, याची मला अजिबात शंका नाही.

SCROLL FOR NEXT