मनोरंजन

‘शमशेरा’तील नर्तकी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री वाणी कपूर एरव्ही नेहमीच मॉडर्न लूक आणि मॉडर्न कॅरेक्टरमध्ये दिसली आहे; पण रणबीर कपूरच्या 'शमशेरा'च्या निमित्ताने ती पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. डाकूंनी ब्रिटिशांशी दिलेला लढा, असा विषय असलेल्या या चित्रपटात वाणीने एका नर्तकीची भूमिका साकारली आहे. तिच्यावर 'शमशेरा' फिदा होतो. हा चित्रपट येत्या 22 जुलैला हिंदी, तमिळ, तेलगूमध्ये रीलिज होणार आहे. आदित्य चोप्रा यांचे फाईंड असलेल्या वाणीने यापूर्वी 'शुद्ध देसी रोमान्स', 'बेफिक्रे'मध्ये काम केले; पण हृतिक रोशनसोबतच्या 'वॉर'मुळे ती प्रकाशझोतात आली.

'चंदीगड करे आशिकी'मध्ये तिने एका ट्रान्सजेंडर मुलीची भूमिका साकारली आहे. आता 'शमशेरा'तील भूमिकेमुळे ती खूश आहे. मोठ्या पडद्यावर सशक्‍त भूमिका साकारायच्या आहेत. 'शमशेरा'मुळे ती संधी मिळाली, असे वाणी म्हणाली. या चित्रपटात संजय दत्तही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा याने केले आहे. करणने यापूर्वी हृतिक रोशनचा 'अग्‍निपथ' दिग्दर्शित केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT