मनोरंजन

विजय देवरकोंडा या साऊथ स्टारचा लायगर’चा फर्स्ट लूक आज दिसणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

विजय देवरकोंडा, अनन्या पांडे यांच्या बहुचर्चित 'लायगर ः क्रॉसब्रीड साला' या चित्रपटाचा टीझर बुधवारी रीलिज केला आणि त्यातून या चित्रपटाची पहिली झलक 31 डिसेंबर रोजी दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. करण जोहरने सोशल मीडियातून हा टीझर शेअर करत ही माहिती दिली आहे. या चित्रपटात अमेरिकन बॉक्सर माईक टायसनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 22 ऑगस्ट रोजी हिंदी, तमीळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम् भाषांत रीलिज होणार आहे. चित्रपटात राम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्याही भूमिका आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT