मनोरंजन

विक्रम वेधा

अमृता चौगुले

विक्रम वेधा हा तमिळ सुपरहिट चित्रपटचा हिंदी रिमेक बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. हिंदी रिमेकमध्ये सैफ अली खानचे नाव अंतिम मानले जात होते. आता हृतिक रोशन या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच सैफसोबत काम करणार आहे.

या चित्रपटाचेही दिग्दर्शन पुष्कर-गायत्री करणार आहेत. मूळ तमिळ चित्रपटात आर माधवन आणि विजय सेठूपती मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट विक्रम-वेताळच्या ऐतिहासिक कथेवर आधारित आहे. ज्यात प्रत्येक वेळी एक गँगस्टर पोलिसांपासून पळून जातो. तर या चित्रपटात सैफ अली खान आणि हृतिक रोशन एकत्र दिसणे मनोरंजक ठरणार आहे.

लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून 30 सप्टेंबर 2022 रोजी तो प्रदर्शित होईल. यापूर्वी या चित्रपटात आमीर खान वेधाची भूमिका साकारणार होता, मात्र त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.

SCROLL FOR NEXT