मनोरंजन

रॅपिड फायर शोजमध्ये मी खूप लोकप्रिय, कार्तिकचा करणला टोला

Arun Patil

सध्या करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'ची बरीच चर्चा आहे. करण त्याच्या पाहुण्यांना प्रश्नच असे विचारतो की त्याची चर्चा व्हावी, त्यावरून वाद व्हावा. त्यामुळेच या शो नंतर बी-टाऊनमधून रूसवे-फुगवे, नखरे, राग असे सगळे भाव व्यक्त होत असतात. आता या सीझनमधील सारा अली खानच्या वक्तव्यावरून अभिनेता कार्तिक आर्यन याने करण जोहरला टोला मारला आहे. कार्तिकला एक प्रश्न विचारला गेला होता की, की त्याला कुठल्या गोष्टीचा अभिमान वाटतो. त्यावर कार्तिक म्हणाला की, 'रॅपिड फायर शोजमध्ये मी खूप प्रसिद्ध आहे.' कार्तिकचे हे उत्तर म्हणजे करणच्या शोला मारलेला टोला समजला जात आहे.

करणच्या शोमधील रॅपिड फायर राऊंड खूप प्रसिद्ध आहे. नुकतीच सारा अली खान आणि जान्हवी कपूर करणच्या शोमध्ये आल्या होत्या. त्यात करणने विचारले होते की, तिचा एक्स (माजी बॉयफ्रेंड) तिचा एक्स का आहे? त्यावर साराने तो सगळ्यांचाच एक्स आहे, असे उत्तर दिले होते. काही वर्षांपूर्वी साराने खुलेआम कार्तिक आर्यन तिचा क्रश असून त्याच्याशी डेटिंगची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोघे काही काळ एकत्र होतेही. पण 'लव्ह आज कल 2'नंतर कार्तिकने साराला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते. कार्तिकच्या कामाबाबत बोलायचे तर सध्या तो 'शहजादा'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय 'फ्रेडी' आणि 'सत्यनारायण की कथा' यातही तो आहे. नुकतेच कार्तिकच्या 'भूल भुलैया 2'ने चांगला बिझनेस केला होता.

SCROLL FOR NEXT