मनोरंजन

राधिका मदानचा नवा चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री राधिका मदान ही मोजके पण लक्षवेधी चित्रपट करत पुढे चालली आहे. टीव्हीवरून कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर तिने फार जास्त चित्रपट केलेले नाहीत. पण जे चित्रपट केले, त्यात दखलपात्र काम नक्‍की केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधत राधिकाने तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 5 सप्टेंबर रोजी रीलिज होणार आहे. चित्रपटाचे नाव 'हॅप्पी टीचर्स डे' असे आहे. सोशल मीडियात व्हिडीओ शेअर करून राधिकाने या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. शिक्षकांवर होणार्‍या गमतीजमतींवर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात राधिकासमवेत अभिनेत्री निम—र कौरदेखील मुख्य भूमिकेत असणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT