मनोरंजन

राजकुमार हिराणी सावरणार अक्षयचे करिअर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे काही चित्रपट अलीकडच्या काळात अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच त्याचा 'कटपुतली' देखील ओटीटीवर येत आहे. याशिवाय अक्षयचे आगामी काळात अनेक चित्रपट येत आहेत. यातच अक्षय आता राजकुमार हिराणींच्या चित्रपटात काम करणार असल्याची माहिती आहे.

एका जाहिरातीसाठी या दोघांनी एकत्रित काम केले होते. तेव्हा दोघेही अत्यंत दिलखुलासपणे मौजमजा करताना दिसले. राजकुमार हिराणी अक्षयमुळे प्रभावित झाले असून लवकरच दोघे एका चित्रपटासाठी एकत्रयेऊ शकतात, अशी शक्यता आहे. सध्या हिराणी शाहरूख खान आणि तापसी पन्नूसोबत 'डंकी'चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसच्या सुमारास प्रदर्शित होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT