Complaint agaist ranveer  
मनोरंजन

रणवीरचा गोविंदाला साष्टांग नमस्कार

स्वालिया न. शिकलगार

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग आघाडीचा स्टार आहे. रणवीरचा बिनधास्तपणा सर्वांना भावतो. नुकताच एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याच्याबरोबरअर्जुन कपूर, आयुष्यमान खुराना, मनीष पॉलदेखील दिसत आहेत. व्हिडीओत रणवीर सिंग त्याच्याबरोबरचे कलाकार गोविंदाचा डान्स बघत आहेत. गोविंदा आपल्या नेहमीच्या शैलीत डान्स करत आहे. गोविंदाचा डान्स संपताच रणवीरने थेट स्टेज गाठले. त्याच्या बरोबरीने अन्य कलाकारही आले; मात्र रणवीर स्टेजवर येताच त्याने गोविंदाला साष्टांग नमस्कार घातला. त्याच्या या कृतीमुळे गोविंदादेखील भावुक झाला. फिल्मफेअरच्या कार्यक्रमात हा प्रसंग घडला. नव्व्दच्या दशकांत गोविंदाने आपल्या डान्सने तमाम प्रेक्षकांना वेड लावले होत. 'आँखे', 'स्वर्ग', 'हथकडी', 'दिवाना मस्ताना', 'कुली नंबर 1' यासारखे सुपरहिट चित्रपट त्याने दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT