मनोरंजन

रणवीर-आलिया हे नव्या जमान्यातील शाहरूख-काजोल

स्वालिया न. शिकलगार

शाहरूख खान आणि काजोल या जोडीने 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएँगे', 'करण अर्जुन', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'माय नेम इज खान', 'दिलवाले' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यातील बहुतांश चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर अशी केमिस्ट्री बॉलीवूडमध्ये पाहायला मिळाली नाही. आता हे आठवण्याचे कारण म्हणजे, निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने नुकतेच रणवीर सिंग आणि आलिया भट्ट हे सध्याच्या काळातील शाहरूख आणि काजोल असल्याचे वक्तव्य केले आहे.

एका मुलाखतीत करण म्हणाला की, रणवीर आणि आलिया ही जोडी पुरेपूर शाहरूख-काजोलसारखी आहे. कॅमेर्‍यात तुम्हाला ती केमिस्ट्री दिसून येते आणि ही केमिस्ट्री चांगली आहे. कारण, ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. करणने असे म्हटले असले, तरी रणवीर-आलियाने आतापर्यंत 'गली बॉय'या एकाच सुपरहिट चित्रपटात काम केले आहे आणि करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और राणी की प्रेमकहानी'चे शूटिंग या दोघांनी पूर्ण केले आहे. त्यामुळे अद्याप या जोडीचा दुसरा चित्रपट रीलिज झालेला नसतानाही त्यांना शाहरूख-काजोलच्या पंक्तीत बसवणे शाहरूख-काजोलच्या फॅन्सना तितकेसे आवडलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT