मनोरंजन

रणधीर कपूर- बबिताचा ‘तो’ दिवस आलाच..!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : करिना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांचे आई- वडील रणधीर कपूर आणि बबिता आता एकत्र राहत आहेत. सुमारे ३५ वर्षांनंतर रणधीर बबिता यांच्यातील दुरावा संपला आहे. रणधीर नि बबिताने १९७१ मध्ये लव्हमॅरेज केले होते. लग्नानंतर १९८८ मध्ये ते वेगळे झाल होते. इतके दिवस दूर राहूनही त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. आता पुन्हा एकत्र राहण्याच्या त्यांच्या निर्णयाने केवळ कुटुंबीय आणि नातेवाईकच खूश नाहीत, तर त्यांचे चाहतेही खूश झाले आहेत.

बबिता सर्व सामान घेऊन पतीच्या वांद्रे येथील नवीन घरात राहण्यासाठी आल्या आहेत. आई-वडील सोबत राहणार असल्याने त्यांच्या मुलीही आनंदी आहेत. कारण आता उतारवयात दोघेही एकाच छताखाली राहू शकतील आणि एकमेकांची काळजी घेऊ शकतील. प्रेमविवाह असूनही लग्नानंतरही ते मतभेदांमुळे वेगळे राहिले. अशा वेळी ३५ वर्षांनंतर त्यांचे पुन्हा एकत्र येणे ही सर्वांसाठी मोठी गोष्ट आहे.

SCROLL FOR NEXT