मनोरंजन

यांचा फोटो कुणाला पाहायचा आहे? जया बच्चन यांच्यावर भडकले नेटकरी

स्वालिया न. शिकलगार

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांना रागीट स्वभावासाठी ओळखले जाते. यामुळे त्यांना अनेकदा ट्रोल केले जाते. आता नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्या विमानतळावर फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर चिडल्याचे दिसत आहे. अमिताभ बच्चनदेखील त्यांच्यासोबत होते. अमिताभ बच्चन पत्नी जया बच्चन यांच्यासोबत इंदूरला पोहोचले. यादरम्यान विमानतळावरील एका व्यक्तीने जया यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर जया खूपच संतापल्या. कृपया माझे फोटो काढू नका, असे दोनदा रागात त्या व्यक्तीला जया यांनी सुनावले. मात्र त्या व्यक्तीने कॅमेरा सुरू ठेवल्याने त्या चांगल्याच संतापल्या. 'तुम्हाला इंग्रजी कळत नाही का?' अशा शब्दात जया यांनी संताप व्यक्त केला. अशा लोकांना नोकरीवरून काढून टाकायला हवे, असे जया म्हणाल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी जया यांना ट्रोल केले आहे. यांचा फोटो कोणाला बघायचा आहे, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT