अभिनेत्री रिया चक्रवर्ती काही ना काही कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती चालताना धडपडत असल्याचे दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी रियावर खूप भडकले आहेत 'हिला स्वत:ची चूक मान्य करायला नको', असे म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. व्हिडीओत रिया पायऱ्या चढताना दिसतेय. मात्र या पायऱ्या चढताना ती अडखळते आणि तोंडावर पडता पडता वाचते. तिला धडपडताना पाहिल्यानंतर पापाराझी तिला सांभाळून चालण्यास सांगतात. फोटोग्राफर्स तिच्या मागून व्हिडीओ शूट करत जात असल्याचे दिसत आहे. मात्र त्यानंतर रिया त्यांच्यावर चिडल्याचे दिसत आहे. 'माझा पाठलाग का करत आहात', असे म्हणत ती पापाराझींवर नाराज होते. रियाच्या याच वागणुकीमुळे नेटकरी तिच्यावर चिडले आहेत. रिया स्वतः चालताना धडपडली, मग त्यात पापाराझींचा काय दोष, असा सवाल एका युजरने केला.