मनोरंजन

‘भाईजान’साठी पूजा, सलमान लडाखमध्ये

Arun Patil

सलमान खान आणि पूजा हेगडे हे त्यांच्या 'भाईजान' या आगामी चित्रपटातील एक रोमँटिक गाण्याच्या शूटिंगसाठी लडाखला गेले आहे.
सलमान खान नेहमीच परदेशातील लोकेशन्सपेक्षा भारतातील सुंदर लोकेशनवर चित्रीकरणास प्राधान्य देत असतो.

भारताप्रमाणे लँडस्केप जगात इतरत्र कुठल्याही देशात नाही, असे सलमानचे मत आहे. त्यामुळेच या चित्रपटाची टीम या गाण्याच्या शूटिंगसाठी लोकेशन शोधत होती तेव्हा सलमाननेच त्यांना लडाख हे ठिकाण सुचविले. आगामी चार दिवस लेह-लडाखमध्ये शूटिंग शेड्यूल असणार आहे. त्यानंतर पुन्हा मुंबईत 2 महिने शूटिंग चालणार आहे. आणि ऑक्टोबरअखेर सर्व चित्रीकरण पूर्ण केले जाणार आहे. यापूर्वी हैदराबाद येथे दोन गाण्यांचे शूटिंग झाले आहे.

या चित्रपटात दाक्षिणात्य कलाकार व्यंकटेश आणि रामचरण तेजाही असणार आहे. हा चित्रपट याचवर्षी 30 सप्टेंबर रोजी रीलिज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे. या चित्रपटाचे नाव पूर्वी 'कभी ईद कभी दिवाली' असे होते. हा चित्रपट तामिळ सुपरस्टार अजित याच्या 'वीरम'या चित्रपटाचा रिमेक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT