मनोरंजन

‘ब्रह्मास्त्र’साठीही काम करणाऱ्या भारतीय व्यक्‍तीस ‘ड्यून’साठी ऑस्कर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय माहितीपटाच्या वाट्याला निराशाच आली असली तरी या सोहळ्यात एका भारतीय व्यक्‍तीस मात्र ऑस्कर मिळाले. 'ड्यून' चित्रपटासाठी नमित मल्होत्रा यांना 'व्हिज्युअल इफेक्टस्'च्या श्रेणीतील ऑस्कर मिळाले. नमित हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी पोस्ट प्रॉडक्शन कंपनी 'प्राईम फोकस'चे संस्थापक आहेत. त्यांची एक कंपनी 'डीएनईजी'च्या बॅनरखाली 'ड्यून' चित्रपटाचे काम झाले. नमित यांचे यंदा ऑस्करमध्ये एक नव्हे तर दोन चित्रपटांसाठी नामांकन झाले होते. यामध्ये 'ड्यून'ला 'बेस्ट व्हिज्युअल' श्रेणीत पुरस्कार मिळाला. सध्या ते रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब—ह्मास्त्र'वरही काम करीत आहेत. सात वर्षांपूर्वीही त्यांना याच श्रेणीत 'इंटरस्टेलर'साठी पुरस्कार मिळाला होता.

SCROLL FOR NEXT