मनोरंजन

बिष्णोई हाच मुसेवाला यांच्या हत्येचा सूत्रधार

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार लॉरेन्स बिष्णोई हाच असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी बुधवारी केला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींची ओळख पटली आहे. सौरभ महाकाळच्या जवळच्या शूटरने मुसेवालांवर गोळ्या झाडल्याचे दिल्ली पोलिसांचे विशेष अधिकारी एच. जी. एस. धालीवाल यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलिसांना महाकाळची 14 दिवसांची कोठडी मिळाली आहे. या हत्याकांडात 8 लोक सामील असून, एकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अटक झालेला आरोपी हा शूटरपैकी एकाचा जवळचा साथीदार आहे. मात्र, त्याचा हत्येत सहभाग नसून खर्‍या शूटर्सना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

SCROLL FOR NEXT