मनोरंजन

बाळाची काळजी घ्या; महीपचा रणबीर-आलियाला सल्ला

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण 7' हा शो चर्चेत आहे. नुकतेच या शोमध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान हिने हजेरी लावली. गौरीसह तिच्या मैत्रिणी भावना पांडे आणि अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने यावेळी सहभाग घेतला.

महीप कपूरने बॉलीवूडमधील लोकप्रिय रणवीर-दीपिका, विकी-कटॅरिना, रणबीर-आलिया या दाम्पत्यांना एक सल्ला दिला आहे. करणने महीप कपूरला रणवीर सिंह-दीपिका पदुकोनला लग्नानंतर कोणता सल्ला देशील, असा प्रश्न विचारला. त्यांना सल्ला देणारी मी कोण आहे? पण, तरीही मी त्यांना चांगला सेक्स करण्याचा आणि तसेच कपडे शेअर न करण्याचा सल्ला देईन, असे ती म्हणाली.

आलिया-रणबीरला सल्ला देताना महीप म्हणाली, लग्नानंतर चांगला सेक्स करा आणि तसेच होणार्‍या बाळाची काळजी घ्या. बॉलीवूडमधील आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ही जोडी एप्रिल महिन्यात विवाहबंधनात अडकली. आता लवकरच ते
आई-बाबा होणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT