मनोरंजन

प्रेक्षकांना काय आवडते हेच कळेना

स्वालिया न. शिकलगार

अभिनेता सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांच्या मुख्य भूमिका असलेला 'विक्रम वेधा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. निर्मात्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने सतत फ्लॉप होणार्‍या बॉलीवूड चित्रपटांबद्दल मत व्यक्त केले. यावेळी त्याने मुख्य कलाकार भरमसाट फी घेतल्याचेही बोलून दाखविले. सैफ म्हणाला, बिग बजेट चित्रपटाच्या कमाईचे आकडे कमी दिसणे खूप निराशाजनक असते.'विक्रम वेधा'सारखा चित्रपट चांगली कमाई का करू शकला नाही,'विक्रम वेधा' या चित्रपटाकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या; मात्र प्रत्यक्षात तसे झालं नाही.सध्या प्रेक्षकांना काय आवडते आणि काय नाही हेच कोणाला कळत नाही. काही कलाकार एका चित्रपटासाठी भरमसाट मानधन घेतात. ही रक्कम खरीच खूप मोठी असते. आपण भली मोठी रक्कम कलाकाराला देतो, पण त्याबदल्यात चित्रपटाची कमाई तेवढी होत नाही.

SCROLL FOR NEXT