मनोरंजन

प्रतीक बब्बर पुन्हा प्रेमात !

मोहसीन मुल्ला

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. प्रतीक चित्रपटांत फारसा दिसत नसला तरी सोशल मीडियावर तो सक्रिय आहे. प्रतीकने व्हॅलेंटाइन दिनी चाहत्यांना एक सरप्राइज दिले आहे. त्याने व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधत सीक्रेट रिलेशनशिप जाहीर केले आहे. अखेर तो कुणाला डेट करतोय हा सस्पेन्स उघड केला आहे. गेले अनेक महिने प्रतीक अभिनेत्री प्रिया बॅनर्जीला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यांना अनेकदा स्पॉटदेखील करण्यात आले. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने प्रतीकने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने सांगितले.

SCROLL FOR NEXT