मनोरंजन

‘पृथ्वीराज’च्या महलसाठी तब्बल 35 कोटींचा खर्च

स्वालिया न. शिकलगार

नवी दिल्ली :

कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर थिएटरमध्ये सध्या बिग बजेट चित्रपटांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. निर्माते ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यावर डाव खेळत आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी 'पृथ्वीराज' हा एक त्याचाच भाग आहे.

निर्मात्यांनी हा चित्रपट हुबेहूब बनविण्यासाठी लढाईची दृश्ये राजस्थानमधील लाईव्ह लोकेशनवर 300 ते 400 ज्युनिअर कलाकार आणि हत्ती घोड्यांसह चित्रित केली. याशिवाय दिल्ली, राजस्थान आणि कनौजमधील आलिशान महल व दरबार रिक्रिएट करण्यासाठी निर्मात्यांनी तब्बल 35 कोटी रुपये खर्च केले आहेत. या चित्रपटाचे बहुतांशी चित्रीकरण मुंबईतील विविध ठिकाणी करण्यात आले आहे. हा एक मल्टिस्टारर चित्रपट आहे.

SCROLL FOR NEXT