मनोरंजन

पलक पुन्हा इब्राहिमसोबत!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

श्वेता तिवारीची कन्या पलक नुकतीच सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब—ाहिमसोबत पुन्हा एकदा दिसून आली. यापूर्वी दोघांना एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आल्यावर तिने चक्क आपला चेहरा झाकून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. तिच्या या कृतीमुळे इब—ाहिमलाही अवडघल्यासारखे झाले होते. याबाबत तो नाराज झाल्याचेही म्हटले जात होते. मात्र, आता पुन्हा एकदा हे दोघे एकत्र दिसून आले. त्यांच्यासमवेत सोहेल खानचा मुलगा निर्वाणही होता. सध्या इब—ाहिम आणि पलक रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना आता यामुळे ऊत आला आहे!

SCROLL FOR NEXT