मनोरंजन

नेटफ्लिक्सकडून पाच चित्रपटांची घोषणा

अनुराधा कोरवी

पुढारी वृत्तसेवा : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधत पाच नव्या नेटफ्लिक्स ओरिजिनल चित्रपटांची घोषणा केली. 'द आर्चीज' या झोया अख्तर दिग्दर्शित चित्रपटाच्या म्युझिक लाँचने या कार्यक्रमाची सुरुवात जाली. कॉमिक बुकवर आधारित या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता आहे. इंडस्ट्रीतील अनेक स्टार किड यातून पदार्पण करत आहेत. खुशी कपूर, इब्राहिम अली खान, सुहाना खान, अगस्त्य नंदा यांच्या यात भूमिका आहेत.

'मोनिका ओ माय डार्लिंग फर्स्ट' या दिग्दर्शक वासन बाला याच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक सादर करण्यात आला. यावेळी चित्रपटातील कलाकार राजकुमार राव, हुमा कुरैशी, राधिका आपटे, सिकंदर खेर उपस्थित होते. रितेश देशमुख आणि तमन्ना भाटिया यांच्या 'प्लान ए प्लान बी'या चित्रपटाचा ट्रेलर यावेळी रीलिज करण्यात आला. हा चित्रपट मॅचमेकर म्हणजे लग्न जुळवणार्‍या आणि घटस्फोट करून देणार्‍या वकिलाची प्रेमकहाणी आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येईल. याशिवाय यामी गौतम, सनी कौशल आणि शरद केळकर 'चोर निकल के भागा' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT