मनोरंजन

नवीन सुरुवात…!

स्वालिया न. शिकलगार

गेल्या काही वर्षांत अनेक बॉलीवूड कलाकारांनी हॉलीवूडपर्यंत झेप घेतली आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोन, आलिया भट्ट यांच्यापाठोपाठ आता अभिनेता इशान खट्टर हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. धडक, अ सुटेबल बॉय, फोन भूत, खाली पिली यासारख्या चित्रपटांतून प्रमुख भूमिका साकारत त्याने बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. सध्या त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. इशानही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. त्याला आता एका हॉलीवूड वेब सीरिजची ऑफर आली आहे. नेटफ्लिक्सच्या आगामी 'द परफेक्ट कपल' या वेब सीरिजमध्ये तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. तर या वेब सीरिजमध्ये तो हॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री निकोल किडमनबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसेल. इशानने ही आनंदाची बातमी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. नवीन सुरुवात, अशी त्याने पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट पाहून त्याचे चाहते आनंदी झाले आहेत. आता या पोस्टवर कमेंट करत नेटकरी तसेच बॉलीवूडमधील इशानची त्याचे मित्र अभिनंदन करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT