मनोरंजन

त्यावेळी मी घाबरलेच : करिश्मा

स्वालिया न. शिकलगार

90 च्या दशकातील नामवंत अभिनेत्रींपैकी एक म्हणजे करिश्मा कपूर 'राजा हिंदुस्तानी', 'दिल तो पागल है', 'हम साथ साथ है', 'राजा बाबू', 'जिगर', 'हिरो नं 1' यासारख्या सुपरहिट चित्रपटातील करिश्माच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले. आज करिश्मा बॉलीवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. करिश्माने अभिनेता सलमान खान याच्यापासून अभिनेता सुनील शेट्टी याच्यासोबतही स्क्रिन शेअर केली आहे, पण सुनीलसोबत काम करताना करिश्मावर अशी वेळ आली होती की घाबरलेल्या करिश्माने सर्वांना पोलिसांना बोलावण्यासाठी सांगितले होते. खुद्द करिश्माने घडलेला प्रसंग सांगितला आहे. एका कार्यक्रमात करिश्मा म्हणाली, 'आम्ही सिनेमाचे शूटिंग करत होतो. मी सेटवर दोन लोकांना मारामारी करताना पाहिले. त्यांना पाहून मला प्रचंड भीती वाटली. त्यावेळी मी खूपच घाबरले होते. त्यावेळी मी सेटवर उपस्थित असलेला लोकांना पोलिसांना बोलवायला सांगितलं होते'. करिश्माने सांगितलेला किस्सा सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT