मनोरंजन

तापसी पन्नूने घेतले नाही मिताली राजकडून ट्रेनिंग

Arun Patil

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'शाबास मिठ्ठू' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती या 'स्पोर्टस् बायोपिक'मध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजची भूमिका साकारत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तापसीने या चित्रपटासंबंधित अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.

या चित्रपटासाठी तापसीने मिताली राजकडून कसलेच ट्रेनिंग घेतलेले नाही. यासंदर्भात तापसीने सांगितले की, मिताली एक सक्रिय खेळाडू असल्याने आम्हाला शूटिंगदररम्यान ती भेटतच नव्हती. याशिवाय त्यावेळी कोव्हिड साथ सुरू होती. त्यावेळी खेळाडू एकतर बायोबबलमध्ये अथवा स्पर्धेत व्यस्त असायचे. अशा कारणांमुळे मितालीला भेटण्याची परवानगी नव्हती. यामुळे मितालीच्या एका जवळच्या मित्राने मला 'शाबास मिठ्ठू'साठी ट्रेनिंग दिल्याचे तापसीने यावेळी सांगितले.

SCROLL FOR NEXT