मनोरंजन

‘डंकी’मध्ये शाहरूखबरोबर दिसणार तापसी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

तब्बल चार वर्षांनंतर शाहरूख खान 'डंकी' या राजकुमार हिराणीच्या चित्रपटातून पुनरागमन करतो आहे. या चित्रपटात त्याच्यापेक्षा 22 वर्षांनी लहान असलेली तापसी पन्नू नायिकेच्या भूमिकेत आहे. ती आता प्रथमच शाहरूखबरोबर झळकणार आहे. शाहरूखने आता वयाची पन्नाशी ओलांडली आहे; पण चेहर्‍यावरील सुरकुत्या लपवत स्वतःपेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रीबरोबर पडद्यावर रोमान्स करताना तो दोन्ही हात उंचावून पुढेच असतो! याआधीही शाहरूखने कमी वयाच्या अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. अवैध स्थलांतर, डंकी फ्लाईटस् या विषयावरील 'डंकी' चित्रपटात आता तापसी शाहरूखबरोबर काम करणार आहे.

कंगना व तिच्या (मॅनेजर) बहिणीने नेहमीच तापसीची 'सस्ती कॉपी' अशी संभावना केलेली आहे. प्रत्येक गोष्टीत कंगनाची नक्कल करण्याची तापसीला सवय आहे, असे त्यांचे म्हणणे. अर्थात कंगनाने (किंवा विद्या बालननेही) आजपर्यंत कधीही शाहरूख खान, सलमान खान, आमीर खान यांच्यासारख्या बड्या स्टार्सच्या कुबड्या घेऊन आपले करिअर बनवलेले नाही. कंगनाने हृतिकसमवेत मात्र दोन चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या आहेत. मात्र, एकंदरीतच तिने अनेक चित्रपट स्वतःच्या हिंमतीवरच यशस्वी करून दाखवले आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले. तापसीनेही काही चांगले चित्रपट केले आहेत आणि तिच्या अभिनयाचेही कौतुक होते. आता शाहरूखसोबत एका बड्या चित्रपटात काम करण्याची तिला संधी मिळाली आहे, त्याबद्दल कंगना काय म्हणते हे पाहायचे!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT