मनोरंजन

टायगरचा ‘स्क्रू ढिला’!

Arun Patil

अभिनेता टायगर श्रॉफ याचा स्क्रू ढिला झालेला नाही. तर टायगर त्याच्या अ‍ॅक्शनने आगामी चित्रपटात व्हिलनचा स्क्रू ढिला करणार आहे. करण जोहर निर्मित आगामी 'स्क्रू ढिला' या चित्रपटात टायगर काम करत असून नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे. त्यात टायगरची नेहमीचीच अ‍ॅक्शनपॅक्ड भूमिका दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक पोस्टर सोशल मीडियात रीलिज करण्यात आले होते. करण जोहरने हा टीझर सोशल मीडियात शेअर करताना, एंटरटेन्मेंटच्या या सॉलिड पंचसह येत आहे, असे म्हटले आहे. या चित्रपटात टायगरसोबत रश्मिका मंदाना देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे.

रश्मिका आणि टायगरच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचे तर तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या 'अलविदा'चे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्राच्या 'मिशन मजनू'मध्ये ती आहे आणि रणबीर कपूरसोबत 'अ‍ॅनिमल'मध्येही ती आहे. टायगर आगामी काळात 'गणपत'मध्ये दिसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT