मनोरंजन

जॉर्जियाच्या पार्टीत शहनाज

Shambhuraj Pachindre

मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज खान जॉर्जिया एंड्रियानीला डेट करू लागला. नुकताच जॉर्जियाचा वाढदिवस झाला व त्यानिमित्ताने अरबाजने मोठी पार्टी दिली होती. या पार्टीत खान कुटुंबीयांची लाडकी शहनाज गिलही उपस्थित होती. पार्टीतील तिचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पांढर्‍या पोशाखातील शहनाज जॉर्जियाला केक भरवत असताना यामध्ये दिसते. शहनाज सलमानच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली'मधून बॉलीवूड डेब्यू करणार आहे. तिला 'बिग बॉस-13' मधून प्रसिद्धी मिळाली होती. सिद्धार्थ शुक्लाबरोबर ती रिलेशनशीपमध्ये होती व सिद्धार्थच्या अकाली मृत्यूनंतर ती खचून गेली. त्यावेळी सलमान खान व त्याच्या कुटुंबीयांनी तिला मोठाच आधार दिला होता.

SCROLL FOR NEXT