मनोरंजन

जॉनी डेप नव्या अवतारात

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क :  हॉलीवूड अभिनेता जॉनी डेप आता नव्या अवतारात दिसणार आहे. खरेतर जॉनी नेहमी त्याच्या चित्रपटातून विविध अतरंगी अवतारात दिसत असतो; पण यावेळचा त्याचा अवतार पडद्यावर नाही, तर पडद्यामागचा आहे. होय. जवळपास 25 वर्षांनंतर जॉनी पुन्हा दिग्दर्शनात हात आजमावत आहे. इटालियन कलाकार अमेडियो मोदिग्लिआनी यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन जॉनी डेप करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती जॉनी आणि अल पचिनो करणार आहेत. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप उघड झालेली नाहीत. किंवा जॉनी स्वतः या चित्रपटात असेल की नाही हे देखील अद्याप स्पष्ट नाही.

अमेडियो मोदिग्लिआनी हे इटलीतील एक चित्रकार होते. ते हयात होते तेव्हा समीक्षकांचीही त्यांना कधी पसंती मिळाली नाही आणि व्यावसायिकद़ृष्ट्या ते अयशस्वीच ठरले; पण 1920 मध्ये मृत्यूनंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या कामाला मोठी मागणी प्राप्त झाली होती. डेनिस मॅकइंटायर यांच्या नाटकावर हा चित्रपट आधारित आहे.

जॉनीने यापूर्वी 1997 मध्ये आलेल्या 'द ब्रेव्ह'या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यात जॉनीसोबत मार्लन ब्रँडो होते. आगामी काळात जॉनी एका चित्रपटात फ्रान्सचा राजा पंधरावा लुई याच्या भूमिकेत दिसणार आहे. पूर्वाश्रमीची पत्नी अँबर हर्ड विरोधात मानहानीचा दावा सुरू झाल्यापासून हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT