वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या 'जुग जुग जियो' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 24 जूनला शानदार कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी चित्रपटाने भारतात 9 कोटी रुपयांपेक्षाही अधिक कमाई केली आहे. चालू वर्षात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा आठवा चित्रपट ठरला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियातून सांगितले की, 105 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ भारतातच 9.28 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले.