मनोरंजन

ग्लॅमरस मानुषीला पाहून काय म्हणाल?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

माजी मिस वर्ल्ड असलेली मानुषी छिल्लर आता 'पृथ्वीराज' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. महाराजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमारने शीर्षक भूमिका साकारली असून मानुषीने संयोगिताची भूमिका केली आहे. संजय दत्त आणि सोनू सूदही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर मानुषीसाठी बॉलीवूडचे दरवाजे खुले झाले होते. मेडिकल स्टुडंट ते मॉडेल व आता अभिनेत्री असा तिचा प्रवास झाला आहे. आता तिने जयपूरच्या अरावली पर्वतराजीत असलेल्या एका हॉटेलमध्ये खास फोटोशूट केले आहे. त्यामधून तिचे ग्लॅमरस रूप चाहत्यांसमोर आले आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले असून ते चांगलेच व्हायरलही होत आहेत.

SCROLL FOR NEXT