मनोरंजन

गर्लफ्रेंड ईशा रिखीसोबत लग्नाच्या वृत्तावर बादशाहने सोडले मौन

स्वालिया न. शिकलगार

रॅपर बादशाह याने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. सध्या बादशाह त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. बादशाह दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा होत्या. तो गर्लफ्रेंड ईशा रिखीबरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. पुन्हा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर बादशाहने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने संताप व्यक्त केला आहे. प्रिय मीडिया, मी तुमचा आदर करतो पण हे चुकीचे आहे. मी लग्न करत नाही आहे. ज्याने कोणी हे वृत्त तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे, त्याला चांगला मसाला शोधाची गरज आहे, असे बादशाहने पोस्टमध्ये आहे. दरम्यान बादशाह ईशा रखीला अनेक दिवसांपासून डेट करत आहे. परंतु याबाबत त्याने कोणतीही अधिकृतरीत्या माहिती दिलेली नाही. तसेच ईशाला डेट करत असल्याच्या अफवांचे बादशाहने खंडनही केलेले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT