पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री क्रिती सेननने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते नेहमीच चर्चेत असते, आता ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे,
क्रितीने अलीकडेच फ्लाईटमध्ये इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला आहे. याआधीही असे अनेक कलाकारांनी असा प्रवास केला आहे; पण क्रितीने केवळ प्रवासच नाही केला, तर त्या फ्लाईटमधील तिच्या कृतीने तिने सर्वांचे मन जिंकले. इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओही शेअर केला आहे.
यात क्रिती कशी प्रवास करत आहे ते दिसत आहे; मात्र क्रितीने तोंडावर मास्क लावला आहे. याचमुळे तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. क्रितीच्या या स्टाईलचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. त्याचवेळी विरल भयानी यांनी क्रितीची आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती विंडो सीटवर बसलेली आहे. यादरम्यान क्रितीच्या तोंडावर मास्क नाही. तसेच, ती तिच्या एका छोट्या चाहत्याशी बोलताना आणि मस्ती करताना दिसत आहे.