मनोरंजन

क्रिती सेननचा व्यायाम करतानाचा व्हिडिओ व्हायरल, तिची फिगर पाहून लोकांनी केले ट्रोल

Arun Patil

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याचे हीरोच नव्हे तर हीरोईनही जीममध्ये व्यायाम करून घाम गाळत असतात. अनेक अभिनेत्री फिटनेसबाबत जागरूक असून त्या वर्कआऊटचे व्हिडीओही सोशल मीडियात शेअर करीत असतात. त्यामध्येच क्रिती सेननचाही समावेश होतो. आता तिने इन्स्टाग्रामवर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

त्यामध्ये ती ट्रेनरच्या मदतीने पाठीचा व्यायाम करीत असताना दिसून येते. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिचे कौतुक केले आहे तरी काहींनी तिला ट्रोलही केले आहे. मात्र, चवळीच्या शेंगेसारखी शिडशिडीत असलेली क्रिती व्यायामाबाबत किती जागरूक आहे व त्याचा तिला किती लाभ होत आहे हेही या व्हिडीओतून दिसून येते.

क्रिती सेननच्या कामाबद्धल बाेलायचे झाले तर तिने जवळजवळ आठ वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आज ते बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. क्रिती सेननने आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर ती लवकरच आदिपुरुष, गणपत, शहजादा आणि भेड़िया या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT