पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री नर्गिस फाखरी हिच्या बहिणीला अटक करण्यात आली आहे. नर्गिसची बहीण आलियावर तिच्या एक्स बॉयफ्रेंड आणि त्याची नवी गर्लफ्रेंड या दोघांच्या हत्येचा आरोप आहे.
अभिनेत्री नर्गिसची बहीण आलिया फाखरी 43 वर्षांची आहे. आलियावर खुनाचा आरोप आहे आणि त्यामुळे ती अचानक प्रकाशझोतात आली आहे. तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंड आणि त्याची नवी गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपाखाली क्वीन्स, न्यूयॉर्क येथे अटक करण्यात आली आहे. डेली न्यूजच्या वृत्तानुसार आलियाने मत्सरातून दोन मजली गॅरेजला आग लावली. ही घडना घडली तेव्हा 35 वर्षीय एडवर्ड जेकब्स आणि 33 वर्षीय अनास्तासिया 'स्टार' एटीन त्या गॅरेजमध्ये उपस्थित होते. आग भडकल्यानंतर त्या दोघांनाही गॅरेजमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
ही बातमी समोर येताच सोशल मीडियावरही खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत नर्गिस फाखरीच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, आलियाने असे कोणतेही दृष्कृत्य केलेले नाही. मला वाटत नाही ती कोणाची हत्या करू शकते. आलिया ती सर्वांची काळजी घेणारी व्यक्ती आहे. ती लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करते,’ असे म्हणत म्हणत आरोप फेटाळले आहेत.
अभिनेत्री नर्गिसने या बातम्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच आलियाचे कोणतेही वक्तव्य पोलिसांकडून अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणात कोणती नवीन अपडेट समोर याकडे चाहत्यांची नजर लागली आहे.