मनोरंजन

कॅटरिना आत्मचरित्र लिहिण्याच्या तयारीत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी आॅनलाईन – कॅटरिना कैफ आता तिच्या कारकिर्दीवर पुस्तक लिहिण्याच्या तयारीत आहे. तिने बॉलीवूडमध्ये 20 वर्षे काढली आहेत. जर कॅटरिनाने तिच्या चित्रपट प्रवासाबद्दल पुस्तक लिहिले तर सलमान खान आणि रणबीर कपूर यांच्यासह अनेक कलाकरांचा उल्लेख त्यात केला जाईल. कॅटरिनाने सलमान आणि रणबीर यांच्यासमवेत अनेक चित्रपट केले आहेत, पण त्यांच्याबरोबर तिचे प्रेमसंबंधही होते.

कॅटरिना एकेकाळी रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. तर सलमान खानचेही एकेकाळी कॅटरिनावर प्रेम होते. सलमानने आतापर्यंत लग्न केले नाही, तर रणबीर आता आलिया भट्टसोबत लग्न करून सुखी संसारात गुंतला आहे. अशा परिस्थितीत कॅटरिनाने तिच्या चित्रपट प्रवासावर एखादे पुस्तक लिहिले आणि त्यात तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलकही दिसली तर या दोघांचेही नावे या पुस्तकात नक्की येतील. त्यामुळे कॅटरिना, सलमान आणि रणबीर यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT