हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी फारकत घेतल्यानंतर ते सध्या आपापल्या नव्या जोडीदारांसह दिसू लागले आहेत. हृतिक सध्या सबा आझादला डेट करतो आहे. नुकताच करण जोहरचा 50 वा वाढदिवस झाला व त्यानिमित्ताने दिलेल्या पार्टीत तो सबाचा हात हातात घेऊन आला! या पार्टीला बॉलीवूडमधील अनेक तारे हजर होते. सबासह पार्टीत आलेल्या हृतिककडे या सर्वांच्या नजरा खिळल्या. त्यांचा या पार्टीतील व्हिडीओही आता व्हायरल होत आहे.