मनोरंजन

उर्वशीबाबत ऋषभच्या काहीच भावना नाहीत

स्वालिया न. शिकलगार

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्वशीचे पंतशी जोडले जात आहे. अर्थात, यावरून ऋषभ आणि उर्वशी यांचे सोशल मीडियावर भांडणही झाले आहे, तरीही भारतीय संघाच्या सामन्यांना उर्वशीची उपस्थिती पुन्हा पुन्हा या दोघांच्या नावाच्या चर्चा सुरू होण्यासाठी पुरेशी ठरत आहे. आता या नात्याचे सत्य ऋषभचा मित्र आणि क्रिकेटर शुभमन गिलने उघड केले आहे. गिलच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मुलाखत घेणारी अँकर शुभमनला उर्वशी आणि पंत यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. संघातही त्याला तिच्या नावाने चिडवले जाते का, असा प्रश्न अँकर शुभमनला विचारताच तो म्हणाला, उर्वशी स्वतःच काही ना काही करत असते आणि लोकांनी तिला चिडवावे, यासाठी त्यांना संधी देते. या सर्वाशी पंतचा काही संबंध नाही. त्याच्या बाजूने उर्वशीसाठी कोणत्याही भावना नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT