मनोरंजन

आलियाचे प्रायव्हेट फोटो प्रसिद्ध झाले आणि….

स्वालिया न. शिकलगार

आदित्य रॉय कपूर याला एका चाहतीने बळजबरीने किस केल्याचा किस्सा ताजा असतानाच आता बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटला अशाच मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. याचे कारण म्हणजे, तिचे काही प्रायव्हेट फोटो एका न्यूज पोर्टलने गुपचूप काढून पोस्ट केले आहेत. आलिया तिच्या घरी आराम करत होती तेव्हाचे हे फोटो असल्यामुळे आलिया चांगलीच भडकली आहे. इन्स्टाग्रामवर संतप्त प्रतिक्रिया देऊन तिने संबंधित न्यूज पोर्टलला खडे बोल सुनावले आहेत. तिचा पती रणबीर कपूर तर संबंधित न्यूज पोर्टलला कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहे. शिवाय, त्याने स्वतःच्या घराची सुरक्षा वाढविण्याचे ठरवले आहे. मुख्य म्हणजे, तो आलियाच्या प्रायव्हसीबाबत खूपच गंभीर आहे. एरव्ही तो मीडियाशी नेहमीच चांगले नाते टिकवून आहे. मात्र, हा मामला गंभीर असल्याचे त्याने म्हटले आहे. दरम्यान, प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने म्हटले आहे की, हे पहिल्यांदाच घडलेले नाही. दोन वर्षांपूर्वी आमचेही फोटो गुपचूप क्लिक केले जात असताना मी पाहिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT