लग्नानंतर आता आलियाने आपल्या एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून नुकतीच आलिया शूटिंग पूर्ण करून मुंबईत परतली आहे. आता करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीखही जाहीर केली आहे. चित्रपटातील मुख्य कलाकार आलिया आणि रणवीर सिंगसोबत सेल्फी शेअर करताना करणने कॅप्शनमध्ये एक कविताही लिहिली आहे. हा चित्रपट 10 फेब—ुवारी 2023 ला प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. त्यामध्ये धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान, आलियाने 18 वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियात शेअर केला आहे. हा फोटो तिला संजय लीला भन्साळी यांनी भेट म्हणून दिला होता. संजयच्या 'बालिका वधू' या चित्रपटासाठी रणबीर आणि आलियाने स्क्रीन टेस्ट दिली होती, त्याचा हा फोटो आहे. त्यावेळी आलिया केवळ बारा वर्षांची तर रणबीर 21 वर्षांचा होता. या चित्रपटातून दोघे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होते; पण गोष्टी जुळून आल्या नव्हत्या!